मुंबई : ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यावर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, ईडीने कोणतीही पूर्वकल्पना न देता राऊत यांच्यावर कारवाई केली. ईडीला राऊत यांच्या मालमत्तेवर टाच आणायचीच होती तर आधी त्यांना माहिती द्यायला पाहिजे होती. त्यामुळे ही कारवाई म्हणजे संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न दिसतो, असे पाटील म्हणाले.
#JayantPatil #SanjayRaut #SanjayRautNews #SanjayRautEDCase #BJPMaharashtra #DevendraFadnavis #KiritSomaiyaNews #ED #esakal #SakalMediaGroup